आजानुबाहु सिद्धिविनायक

आजानुबाहु सिद्धिविनायक

 

आजानुबाहु सिद्धिविनायक
लोखंडे तालमी जवळ, पुणे

संकलन – सुधीर लिमये पेण

पुणे शहरातील लोखंडे तालमीजवळ, एका इमारतीच्या तळघरात हे वैशिष्ट्यपूर्ण बाप्पा विराजमान झाले आहेत.

सुमारे चार फूट उंची असलेली, काळ्या पाषाणात घडविलेली पण शेंदरी रंगाची, दोन्ही हात गुडघ्यांपर्यंत पोहोचलेली अशी ही आजानुबाहु गणेशाची मूर्ती पुणे शहरात तरी एकमेव, हे निश्चित!

सिद्धिविनायकाने पुढील उजव्या हातात जपमाळ, तर डाव्या हातात लाडू धरलेला आहे. मागील दोन्ही हातात शस्त्रे आहेत. सुपासारखे कान आणि मूर्तीच्या अंगावरच घडविलेला मुकुट आहे. पायाशी लहानसा हनुमंत आहे.

सदर मंदिर सणस कुटुंबियांच्या मालकीचे असून, मंदिरात त्यांच्या पूर्वजांची समाधी देखील आहे.

लेखक – साकेत नितीन देव.