मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

 

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

1अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? – कोणत्याही गोष्टीला ठरावीक मर्यादा असते .
2अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे .
3अंगाला सुटली खाज , हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते .
4अंगावरचे लेणे , जन्मभर देणे – दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे .
5अंथरूण पाहून पाय पसरावे – आपली ऐपत , वकूब पाहून वागावे .
6अंधारात केले , पण उजेडात आले – कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच .
7अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे – नाव मोठे लक्षण खोटे .
8अडला हरी गाढवाचे पाय धरी – एखाद्या बुद्धिमान मानसालादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख , दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते .
9अति खाणे मसनात जाणे – अति खाणे नुकसानकारक असते .
10अति झाले अन् आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ती दु:खदायी ठरते .
11अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो .
12अति परिचयात अवज्ञा – जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो .
13अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो , त्याचे मुळीच काम होत नाही .
14अन्नछत्री जेवणे , वर मिरपूड मागणे – दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची , त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे .
15अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती .
16असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो .
17असतील शिते तर जमतील भुते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला , की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात .
18आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे .
19आईची माया अन् पोर जाईल वाया – फार लाड केले तर मुले बिघडतात .
20आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता , त्याच वेळी फायद्याची गोष्ट होणे .
21आत्याबाईला जर मिशा असत्या तर – नेहमी एखाद्या कामात जर-तर या शक्यतांचा विचार करणे .
22आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पाहणे , नंतर देवधर्म करणे .
23आधीच तारे , त्यात गेले वारे – विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे .
24आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे – स्वत:च्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे .
25आपला हात जगन्नाथ – आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते .
26आपली पाठ आपणास दिसत नाही – स्वत:चे दोष स्वत:ला दिसत नाही .
27आपलेच दात आणि आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते .
28आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
29आयजीच्या जीवावर बायजी उदार – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
30आयत्या बिळावर नागोबा – एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
31आलिया भोगासी असावे सादर – तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे .
32आवळा देऊन कोहळा काढणे – आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
33इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिति निर्माण होणे .
34इच्छा परा ते येई घरा – आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
35इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते – इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.
36इन मीन साडेतीन – एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
37ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो – जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.
38उंदराला मांजर साक्ष – ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे .
39उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी – प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.
40उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले – फायद्याची वेळी येणे; पण लाभ न घेता येणे.
41उकराल माती तर पिकतील मोती – मशागत केल्यास चांगले पीक येते .
42उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? – एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
43उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती? – जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.
44उचलली जीभ लावली टाळ्याला – दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे .
45उठता लाथ बसता बुक्की – प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे.
46उडत्या पाखराची पिसे मोजणे – अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
47उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
48उतावळी बावरी (नवरी) म्हातार्‍याची नवरी – अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.
49उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
50उथवळा नवरा गुढग्याला बाशिंग – अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे .
51उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी – जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.
52उधारीची पोते, सव्वा हात रिते – उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
53उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे – श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच.
54उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे – येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.
55उसाच्या पोटी कापूस – सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती.
56ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – अतिशय हलाखीची स्थिती.
57ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये – कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
58ऊसाच्या पोटी कापूस – सद्गुण माणसाच्या पोटी दुर्गणी संतती .
59एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला – एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
60एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
61एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी – बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य
62एका खांबावर द्वारका – एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
63एका पिसाने मोर होत नाही – थोड्याश्या यशाने हुरळून जाणे
64एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत – दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.
65एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
66एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.
67एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी – दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.
68एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये – दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
69एकावे जनाचे करावे मनाचे – लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे .
70ऐंशी तेथे पंचाऐंशी – अतिशय उधळेपणाची कृती.
71ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार | – मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.
72ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे? – सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.
73ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो की तारंबी तुटो – कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.
74ओळखीचा चोर जीवे न सोडली – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
75औटघटकेचे राज्ये – अल्पकाळ टिकणारी गोष्ट .
76कणगीत दाणा तर भिल उताणा – गरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.
77कधी तुपाशी तर कधी उपाशी – सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही .
78कर नाही त्याला डर कशाला ? – ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ?
79करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते – काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते.
80करावे तसे भरावे – जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.
81करीन ते पूर्व – मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.
82करून करून भागला , देवध्यानी लागला – भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पूजेला लागणे .
83कशात काय नि फाटक्यात पाय – वाइटात आणखी वाईट घडणे .
84का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ – निरर्थक गोष्टींची काळजी करणे.
85कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात – चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
86काकडीची चोरी फाशीची शिक्षा – अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.
87काखेत कळसा गावाला वळसा – जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे
88काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती – क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढयापुरताच असतो .
89काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही – रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही.
90काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही – जे काम भरपूर पैसा आणि होत नाही, ते थोड्याश्या अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.
91काडीचोर तो माडीचोर – एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे.
92काना मागुन आली आणि तिखट झाली – श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
93कानात बुगडी , गावात फुगडी – आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे .
94कानामागून आली अन् तिखट झाली – श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे .
95काप गेले नी भोके राहिली – वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या
96कामापुरता मामा – आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
97काल महिला आणि आज पितर झाला – अतिशय उतावळेपणाची वृत्ती.
98काल मेला आणि आज पितर झाला – अतिशय उतावळेपणाची वृत्ती .
99काळ आला पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे .
100कावळा बसला आणि फांदी तुटली – परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे
101कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते .
102कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते – पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे .
103कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते – पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.
104कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा – दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.
105कुडी तशी फोडी – देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे .
106कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही .
107कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
108केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले – एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
109केळीला नारळी अन घर चंद्रमौळी – अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.
110केस उपटल्याने का मढे हलके होते ? – जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही.
111कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी – महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.
112कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी – चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला
113कोल्हा काकडीला राजी – लहान लहान गोष्टींनी खुश होतात.
114कोळसा उगाळावा तितका काळाच – वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.
115खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते – खर्च करणार्‍याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.
116खऱ्याला मरण नाही – खरे कधीच लपत नाही.
117खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
118खाऊ जाणे तो पचवू जाणे – एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो.
119खाऊन माजावे टाकून माजू नये – पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.
120खान तशी माती – आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.
121खायला काळ भुईला भार – निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
122खोट्याच्या कपाळी गोटा – खोटेपणा , वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते .
123ग ची बाधा होणे – गर्व चढणे .
124गरज सरो, वैद्य मरो – एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे.
125गरजवंताला अक्कल नसते – गरजेमुळे अडणार्‍याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.
126गरजेल तो पडेल काय – केवळ बडबडणार्या माणसाकडून काही घडत नाही.
127गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.
128गळ्यात पडले झुंड हसून केले गोड – गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते.
129गळ्यातले तुटले ओटीत पडले – नुकसान होता – होता टळणे .
130गाड्याबरोबर नळ्याची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.
131गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ – मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो.
132गाढवाच्या पाठीवर गोणी – एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा.
133गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता – मुर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो.
134गाढवाला गुळाची चव काय ? – ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
135गाय व्याली, शिंगी झाली – अघटित घटना घडणे.
136गाव करी ते राव न करी – श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.
137गोगलगाय न पोटात पाय – बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती.
138घडाई परिस मडाई जास्त – मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे.
139घर ना दार देवळी बिऱ्हाड – शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती .
140घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात – एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात.
141घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे – अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे
142घरोघरी मातीच्याच चुली – एखाद्या बाबतीत सामन्यात: सर्वत्र सारखीच परिस्थिति असणे .
143घेता दिवाळी देता शिमगा – घ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.
144घोडे कमावते आणि गाढव खाते – एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा.
145चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ – मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.
146चार जणांची आई बाजेवर जीव जाई – जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही.
147चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
148चालत्या गाडीला खीळ – व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे .
149चालत्या गाडीला खीळ – व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.
150चिंता परा येई घरा – दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि ते आपल्यावरच उलटते.
151चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला – स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.
152चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई – घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे.
153चोर सोडून संन्याशालाच फाशी – खर्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
154चोरांच्या हातची लंगोटी – ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे.
155चोराची पावली चोराला ठाऊक – वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
156चोराच्या उलट्या बोंबा – स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
157चोराच्या मनात चांदणे – वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते.
158चोरावर मोर – एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.
159जलात राहून माशाशी वैर करू नये – ज्यांच्या सहवासात रहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
160जळतं घर भाड्याने कोण घेणार ? – नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ?
161जळे आणि हनुमान बेंबी चोळे – दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे
162जशी देणावळ तशी धुणावळ – मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
163जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – बाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही.
164जारात तुरी भट भटणीला मारी – काल्पनिक गोष्टीवरुन भांडण करणे
165जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे – दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते.
166जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले – जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे.
167जे न देखे रवि ते देखे कवी – जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो.
168जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी – अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे.
169जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? – जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते.
170ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी – एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.
171ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे.
172ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे – एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.
173ज्याच्या हाती ससा, तो पारधी – ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.
174झाकली मूठ सव्वा लाखाची – व्यंग नेहमी झाकून ठेवावे.
175टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही – कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही.
176डोळ्यात केर आणि कानात फुंकर – रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी.
177ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला – वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो.
178ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा – वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.
179तट्टाला टूमणी, तेजीला इशारत – जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.
180तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसे – अगदी उलट गुणधर्म दिसणे.
181तळे राखील तो पाणी चाखील – ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच.
182ताकापुरते रामायण – एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.
183तितका संताप – कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असणे
184तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही – चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.
185तीन दगडात त्रिभुवन आठवते – संसार केल्यावरच खरे मर्म कळते.
186तुकारामबुवांची मेख – न सुटणारी गोष्ट
187तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचे – आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात.
188तेरड्याचा रंग तीन दिवस – कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते.
189तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले – मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
190तोंड दाबून बुक्क्यांचा मार – एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे.
191तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे – खायला पुढे कामाला मागे.
192थेंबे थेंबे तळे साचे – दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.
193थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान – मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.
194दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो.
195दस की लकडी एक्का बोजा – प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते.
196दहा गेले, पाच उरले – आयुष्य कमी उरणे.
197दाखविलं सोनं हसे मुल तान्हं – पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.
198दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत – एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे.
199दात कोरून पोट भरत नाही – मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.
200दाम करी काम, बिवी करी सलाम – पैसे खर्च केले की कोणतेही काम होते.
201दिल चंगा तो कथौटी में गंगा – आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळ असते.
202दिल्ली तो बहुत दूर है – झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.
203दिवस बुडाला मजूर उडाला – रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.
204दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसातदेखील दोष असतो.
205दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते – एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
206दुभत्या गाईच्या लाथा गोड – ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.
207दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.
208दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही – दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही.
209दृष्टीआड सृष्टी – आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.
210देखल्या देवा दंडवत – सहज दिसले म्हणून चौकशी करणे.
211देणे कुसळांचे घेणे मुसळाचे – पैसे कमी आणि काम जास्त.
212देव तारी त्याला कोण मारी ? – देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.
213देवा दंडवत – एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे.
214देश तसा वेश – परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.
215दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला – नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे
216दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई – नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.
217दैव देते आणि कर्म नेते – नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.
218दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी – नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते.
219दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी – दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही.
220धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी – कोणत्याच कामाचे नसणे.
221धर्म करता कर्म उभे राहते – एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.
222धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा – छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे.
223धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या – गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.
224न कर्त्याचा वार शनिवार – एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो.
225नऊ दिवस – कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.
226नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने – दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात
227नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये – नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.
228नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे – केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे.
229नाक दाबले, की तोंड उघडते – एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.
230नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे
231नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठा वाढणे
232नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला – आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.
233नागिन पोसली आणि पोसणाराला डसली – वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच
234नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे – एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे
235नाचता येईना अंगण वाकडे – आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे
236नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे – देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.
237नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा – नाव मोठे लक्षण खोटे.
238नावडतीचे मीठ आळणी – आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते
239नाही पण जण्याची तरी असावी – एखादी वाईट कृत्य करताना म्हणाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा
240निंदकाचे घर असावे शेजारी – निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात
241नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन – अतिशय हटवादीपणाची वर्तन करणे
242पडलेले शेण माती घेऊन उठते – एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने किती जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच
243पदरी पडले पवित्र झाले – कोणती गोष्ट एकदा स्वीकारली कितीला नाव ठेवणे उपयोगाचे नसते
244पळसाला पाने तीनच – सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे
245पाचामुखी परमेश्वर – बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे
246पाची बोटे सारखी नसतात – सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात
247पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे – अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही
248पाप आढ्यावर बोंबलते – पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही
249पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम – जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो
250पायाची वाहन पायीच बरी – मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो.
251पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली – पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे
252पी हळद नि हो गोरी – कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे
253पुढच्याच ठेच मागचा शहाणा – दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो
254पुढे तिखट मागे पोचट – दिसायला फार मोठी पण प्रत्यक्षात तसे नसणारे
255पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली – फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे
256पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा – पैसा कमी काम जास्त
257पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी – स्वतः जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे
258पोर होईल ना व सवत साहिना – आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही
259फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय – राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो
260फुटका डोळा काजळाने साजरा करावा – आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा
261फुल ना फुलाची पाकळी – वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे
262फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे – जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे
263बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना – निरुपयोगी गोष्ट
264बडा घर पोकळ वासा – दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव
265बळी तो कान पिळी – बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो
266बाप तैसा बेटा – बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे .
267बाप से बेटा सवाई – वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार
268बारक्या फणसाला म्हैस राखण – ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे
269बावळी मुद्रा देवळी निद्रा – दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस
270बुडत्याला काडीचा आधार – घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते
271बैल गेला आणि झोपा केला – एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते
272बोडकी आली व केस कर झाली – विधवा आली अन लग्न लावून गेली
273बोलेल तो करेल – काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही
274भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी – एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो
275भरवशाच्या म्हशीला टोणगा – ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे
276भागीचे घोडे की किवणाने मेले – भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही
277भिंतीला कान असतात – गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहात नाही
278भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री – व्यक्ती काही कारण नसताना भीत असते
279भीक नको पण कुत्रा आवर – एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती
280भीड भिकेची बहीण – उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे
281मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये
282मन जाणे पाप आपण – केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच
283मन राजा मन प्रजा – हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारे ही आपली मनच असते
284मनात मांडे पदरात धोंडे – केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती
285मनी वसे ते स्वप्नी दिसे – ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे
286मल्हारी माहात्म्य – नको तिथे नको ती गोष्ट करणे.
287मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही – आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते
288माणकीस बोललं, झुणकीस लागलं – एकाला बोलणे अन् दुसऱ्या लागणे
289मानेवर गळू आणि पायाला जळू – रोग एकीकडे उपाय भलतीकडे
290मामुजी मेला अन् गांव गोळा झाला – क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे
291मारुतीची शेपूट – लांबत जाणारे काम
292मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू – छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे
293मुंगीला मुताचा पूर – लोकांना लहान संकट ही डोंगराएवढी वाटते
294मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते
295मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते – मूर्खांचे भांड अन् तिसऱ्याचा लाभ
296म्हशीला मणभर दूध – मेल्यावर गुणगान करणे
297म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही – निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच म्हशीचे दुध काढतांना आधी आचळाला दूध लागावे लागते फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते
298यथा राजा तथा प्रजा – सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात
299या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे – बनवाबनवी करणे
300ये रे कुत्र्या खा माझा पाय – आपण होऊन संकट ओढवून घेणे
301रंग जाणे रंगारी – ज्याची विद्या त्यालाच माहीत
302रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे
303राईचा पर्वत करणे – मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे
304राज्याचे घोडे आणि खासदार उडे – वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची
305रात्र थोडी सोंगे फार – कामे भरपूर पण वेळ थोडा असणे
306रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत – मुख्य गोष्टीचा अभाव
307रे माझ्या मागल्या – ताक कण्या चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे
308रोज मरे त्याला कोण रडे – तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही
309लंकेत सोन्याच्या विटा – दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो
310लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही – धाका शिवाय शिस्त नाही
311लग्नाला गेली आणि बारशाला आली – अतिशय उशिराने पोहोचणे
312लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस – मुख्य कार्य पेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक लष्कराच्या भाकर्‍या भाजणे बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे
313लाज नाही मला कोणी काही म्हणा – निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही
314लेकी बोले सुने लागे – एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे
315लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण – लोकांना उपदेश करायचा पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही
316वरातीमागून घोडे – योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे
317वळणाचे पाणी वळणावर जाणे – निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार
318वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच – वाईट व्यक्तीला चांगली म्हंटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच
319वारा पाहून पाठ फिरविणे – परिस्थिती पाहून वर्तन करणे
320वासरात लंगडी गाय शहाणी – मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो
321वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे – सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे
322विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर – गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे
323विचाराची तूट तेथे भाषणाला उत – मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते
324विशी विद्या तिशी धन – योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो
325विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी – विश्वासघात करणे
326शहाण्याला शब्दाचा मार – शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते
327शितावरून भाताची परीक्षा – वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती
328शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी – चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात
329शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? – शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही
330शेजीबाईची कढी, धावधाव वाढी – एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे
331शेरास सव्वाशेर – चोरावर मोर एकाला दुसरा वरचढ भेटणे
332श्रीच्या मागोमाग ग येतो – संपत्तीबरोबर गर्व येतो
333संग तसा रंग – संगती प्रमाणे वर्तन असणे
334संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात – एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे
335सगळेच मुसळ केरात – मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे
336समर्थाघरचे श्वान त्याला सर्व देती मान – मोठा च्या घरच्या शूद्रालाही मान द्यावा लागतो
337सरड्याची धाव कुंपणापर्यंतच – प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते
338सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी – एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे
339सात हात लाकुड नऊ हात ढलपी – एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे
340साप साप म्हणून भुई धोपटणे – संकट नसताना त्याचा अभ्यास निर्माण करणे
341सारा गांव मामाचा एक नाही कामाचा – जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे
342सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – वैभव गेले तरी ताठा जात नाही
343सुरुवातीलाच माशी शिंकली – आरंभालाच अपशकून
344स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे – वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही
345हत्ती गेला पण शेपूट राहिले – कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिला
346हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते – जेथे भलेभले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवितात
347हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा – मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे
348हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते – आजार, संकटे येतात ती लवकर आणि मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात
349हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसर्‍याला देणे स्वतःला झीज लागू न देणे
350हाजिर तो वजीर – जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो
351हात ओला तर मित्र भला – म्हणजेच तुमच्या पासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात
352हात फिरे तिथे लक्ष्मी वसे – उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते
353हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे – जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातली सोडण्याची पाळी येणे
354हातच्या काकणाला आरसा कशाला – स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको
355हिरा तो हिरा गार तो गार – गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत
356हिऱ्या पोटी गारगोटी – चांगल्या च्या पोटी नाठाळ
357हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा – खोटे अश्रू ढाळणे
358होळी जळाली आणि थंडी पळाली – होळीनंतर थंडी कमी होते