मातंगेश्वर महादेव मंदिर
खजुराहो, जि. छत्रपुर, मध्यप्रदेश.
संकलन – सुधीर लिमये पेण
खजुराहो जिल्हा छत्रपुर, मध्यप्रदेश येथील मंदिरे आपल्याला मंदिराच्या बाह्यभागावर कोरलेल्या मैथुन शिल्पामुळे प्रसिध्द आहेत.
या भागात एकुण 85 मंदिरे होती. त्यातील काही शिल्लक मंदिरात मातंगेश्वर महादेव मंदिर आहे. फार पुर्वी पासुन या मंदिरात नित्य नियमाने पुजा होत असते.
खजुराहो बस स्टॅण्ड (यशोवर्मन) पासुन १ किमी अंतरावर आहे. लक्ष्मण मंदिर या मंदिरा पासुन जवळच आहे. चंदेल वंशाच्या राजा चंद्रदेवने या महादेव मंदिराची स्थापना ९००-९२५ CE या दरम्यान केली. हे मंदिर फार साधे आहे. भिंतीवर फक्त फुलांची नक्षी आहे.
मातंगेश्वर मंदिर खजुराहो येथील सर्वात उंच मंदिर आहे. हे मंदिर पुर्वाभिमुखी आहे. मंदिरात जाण्यासाठी आपल्याला तीस उंच पाय-या काढल्या लागतात. या मंदिरातील शिवपिंड आकाराने प्रचंड मोठी आहे.
दरवर्षी शरद पौर्णिमेला तीळभर उंच व तेवढेच रूंदीनेही वाढत आहे. सध्याचा पिंडीचा आकार ९ फुट उंच व ४ फुट रूंद आहे. चौथ-याचा आकार एक मीटर उंच ७.५ मीटर रूंद आहे.
या मंदिरा विषयी आख्यायिका अशी आहे की, भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन युधिष्ठीरांना मार्कंड (मरकत मणी) मणी दिला. युधिष्ठीरांनी तो मणी मातंग ऋषींना दिला. मातंग ऋषींनी तो हर्षवर्मन राजाला दिला. हर्षवर्मन राजाने त्या मण्याचे महत्व जाणुन मंदिर उभारताना तो तळात स्थापित केला.
खजुराहो मंदिर समूहाला, मंदिरातील शिल्पे, त्यावरची कला, चंडेला शैलीसाठी १९८६ साली युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला आहे.
श्री. पुरुषोत्तम लेले, पुणे शिल्पकथा ९३०
माहिती:
१) स्वप्ना कुलकर्णी
२) पुनम व्दिवेदी
३) विकिपीडिया
४) गुगलच्या सहकार्याने