वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ

1प्रश्नांची सरबत्ती करणे – एकसारखे प्रश्न विचारणे .
2प्राणावर उदार होणे – जिवाची पर्वा न करणे .
3फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे .
4फुटाण्यासारखे उडणे – झटकन राग येणे .
5बत्तिशी रंगवणे – जोराने थोबाडात मारणे .
6बारा वाजणे – पूर्ण नाश होणे .
7बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे .
8बेत हाणून पाडणे – बेत सिद्धीला जाऊ न देणे .
9बोल लावणे – दोष देणे .
10बोळयाने दूध पिणे – बुद्धीहीन असणे .
11भगीरथ प्रयत्न करणे – चिकाटीने प्रयत्न करणे .
12भान नसणे – जाणीव नसणे .
13भारून टाकणे – पूर्णपणे मोहून टाकणे .
14मान ताठ ठेवणे – स्वाभिमानाने वागणे .
15सर्वस्व पणाला लावणे – सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे .
16साक्षर होणे – लिहिता – वाचता येणे .
17साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे .
18सामोरे जाणे – निधड्या छातीने संकटास तोंड देणे .
19सुतोवाच करणे – पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे .
20सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे .
21स्वप्न भंगणे – मनातील विचार कृतीत न येणे .
22स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने , गर्वाने अतिशय फुगणे .
23हट्टाला पेटणे – मुळीच हट्ट न सोडणे .
24हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे .
25हरभऱ्याच्या झाडावर चढवणे – खोटी स्तुती करून मोठेपणा देणे .
26हसता हसता पुरेवाट होणे – अनावर हसू येणे .
27हस्तगत करणे – ताब्यात घेणे .
28हात ओला होणे – फायदा होणे .
29हात झाडून मोकळे होणे – जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे .
30हात टेकणे – नाइलाज झाल्याने माघार घेणे .
31हात देणे – मदत करणे .
32हात मारणे – भरपूर खाणे .
33हात हलवत परत येणे – काम न होता परत येणे .
34हातचा मळ असणे – सहज शक्य असणे .
35हातपाय गळणे – धीर सुटणे .
36हातवार तुरी देणे – डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे .
37हातात कंकण बांधणे – प्रतिज्ञा करणे .
38हातापाया पडणे – गयावया करणे .
39हाय खाणे – धास्ती घेणे .
40हूल देणे – चकवणे .
41माशा मारणे – कोणताही उद्योग न करणे .
42मिशीवर ताव मारणे – बढाई मारणे .
43मूग गिळणे – उत्तर न देता गप्प राहणे .
44मधाचे बोट लावणे – आशा दाखवणे .
45मनात घर करणे – मनात कायमचे राहणे .
46मशागत करणे – मेहनत करून निगा राखणे .
47रक्ताचे पाणी करणे – अतिशय मेहनत करणे .
48राख होणे – पूर्णपणे नष्ट होणे .
49राब राब राबणे – सतत खूप मेहनत करणे .
50राम नसणे – अर्थ नसणे .
51राम म्हणणे – मृत्यू येणे .
52वकीलपत्र घेणे – एखाद्याची बाजू घेणे .
53वाट लावणे – विल्हेवाट लावणे .
54वठणीवर आणणे – ताळ्यावर आणणे .
55वाचा बसणे – एक शब्दही बोलता न येणे .
56वेड घेऊन पेडगावला जाणे – मुद्दाम डोंग करणे .
57शिगेला पोचणे – शेवटच्या टोकाला जाणे .
58शंभर वर्ष भरणे – नाश होण्याची वेळ येणे .
59श्रीगणेशा करणे – आरंभ करणे .
60दगा देणे – फसवणे .
61दबा धरून बसणे – टपून बसणे .
62दात धरणे – वैर बाळगणे .
63दाढी धरणे – विनवणी करणे .
64दगडावरची रेघ – खोटे बोलणारे शब्द .
65दाती तृण धरणे – शरणागती पत्करणे .
66दातास दात लावून बसणे – काही न खाता उपाशी राहणे .
67धारातीर्थ पडणे – रणांगणावर मृत्यू येणे .
68धूम ठोकणे – वेगाने पळून जाणे .
69धूळ चारणे – पूर्ण पराभव करणे .
70नजरेत भरणे – उठून दिसणे .
71पाठीशी घालणे – संरक्षण देणे .
72पाणी पडणे – वाया जाणे .
73पाणी पाजणे – पराभव करणे .
74पाऊल वाकडे पडणे – वाईट मार्गाने जाणे .
75पोटात घालणे – क्षमा करणे .
76जीव भांड्यात पडणे – काळजी दूर होणे .
77जीव अधीर होणे – उतावीळ होणे .
78डोळे निवणे – समाधान होणे .
79ताळ्यावर आणणे – योग्य समज देणे .
80तळपायाची आग मस्तकात जाणे – अतिशय संताप होणे .
81थांग न लागणे – कल्पना न येणे .
82कपाळमोक्ष होणे – मरण पावणे .
83कायापालट होणे – स्वरूप पूर्णपणे बदलणे .
84कंठस्नान घालणे – ठार मारणे .
85खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे .
86खसखस पिकणे – मोठ्याने हसणे .
87खूणगाठ बांधणे – निश्चय करणे .
88खडे चारणे – शरण येण्यास भाग पाडणे .
89खडे फोडणे – दोष देणे .
90खो घालणे – विघ्न निर्माण करणे .
91घर धुऊन नेणे – सर्वस्वी लुबाडणे .
92घाम गाळणे – खूप कष्ट करणे .
93घोडे मारणे – नुकसान करणे .
94चतुर्भुज होणे – लग्न करणे .
95चंग बांधणे – निश्चय करणे .
96अंग धरणे – लठ्ठ होणे .
97अर्धचंद्र देणे – हकालपट्टी करणे .
98अंगाची लाही होणे – खूप राग येणे .
99अन्नास जागणे – उपकाराची आठवण ठेवणे .
100आकाश फाटणे – चारी बाजूंनी संकटे येणे .
101आच लागणे – झळ लागणे .
102उखळ पांढरे होणे – पुष्कळ फायदा होणे .
103उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती .
104निवास करणे – राहणे .
105सांगड घालणे – मेळ साधणे .
106विहरणे – संचार करणे .
107मान्यता पावणे – सिद्ध होणे .
108कहर करणे – अतिरेक करणे .
109रियाज करणे – सराव करणे .
110पाठिंबा देणे – दुजोरा करणे .
111चेहरा खुलणे – आनंद होणे .
112ओढा असणे – कल असणे .
113समरस होणे – गुंग होणे .
114प्रतिष्ठा लाभणे – मान मिळणे .
115मात करणे – विजय मिळवणे .
116सहभागी होणे – सामील होणे .
117हवालदिल होणे – हताश होणे .
118धुडगूस घालणे – गोंधळ करणे .
119गाडी अडणे – खोळंबा होणे .
120निद्राधीन होणे – झोपणे .
121प्रत्यय येणे – प्रचिती येणे .
122रवाना होणे – निघून जाणे .
123देखभाल करणे – जतन करणे .
124डोळे फिरणे – खुप घाबरणे .
125पाळी येणे – वेळ येणे .
126दडी मारणे – लपून राहणे .
127व्रत घेणे – वसा घेणे .
128प्रतिकार करणे – विरोध करणे .
129टिकाव लागणे – निभाव लागणे .
130हशा पिकणे – हस्यस्फोट होणे .
131वजन पडणे – प्रभाव पडणे .
132बेत करणे – योजना आखणे .
133पदरी घेणे – स्वीकार करणे .
134भ्रमण करणे – भटकंती करणे .
135देखरेख करणे – राखण करणे .
136उदास होणे – खिन्न होणे .
137अमलात आणणे – कारवाई करणे .
138सूड घेणे – बदला घेणे .
139नाळ तोडणे – संबंध तोडणे .
140जिवाची मुंबई करणे – अतिशय चैनबाजी करणे .
141अंगाला होणे – अंगला छान बसणे .
142कच्छपी लागणे – नादी लागणे .
143उसंत मिळणे – वेळ मिळणे .
144दक्षता घेणे – काळजी घेणे .
145अंग चोरणे- फारच थोडे काम करणे.
146अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे.
147अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे.
148अंगवळणी पडणे- सवय होणे.
149उर भरून येणे- गदगदून येणे.
150कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे.
151कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे.
152कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.
153काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे .
154कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
155कान उपटणे- कडक शब्दात समजावणे.
156कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
157कान निवणे- ऐकुन समाधान करणे.
158कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे.
159कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे.
160कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.
161कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.
162कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे.
163कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे.
164कानावर घालणे- लक्षात आणून देणे.
165कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे.
166केसाने गळा कापणे- घात करणे.
167कंठ दाटून येणे- गहिवरून येणे.
168कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे.
169कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे.
170कंबर कसणे- जिद्दीने तयार होणे.
171कंबर खचणे- धीर सुटणे.
172खांद्याला खांदा भिडवने- सहकार्य व एकजुटीने काम करणे.
173गळा काढणे- मोठ्याने रडणे.
174गळा गुंतणे- अडचणीत सापडणे.
175गळ्यात गळा घालणे- खूप मैत्री करणे.
176गळ्यातला ताईत होणे- अत्यंत आवडता होणे.
177गळ्यापर्यंत बुडणे- कर्जबाजारी होणे, डबघाईला येणे.
178चेहरा खुलने- आनंदित होणे.
179चेहरा पडणे- लाज वाटणे, खजील होणे.
180छाती दडपणे- घाबरून जाणे.
181जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.
182जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे. 
183डोक्यावर खापर फोडणे- निर्दोष माणसावर दोष टाकणे.
184डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे.
185डोळा असणे- नजर/पाळत ठेवणे.
186डोळा लागणे- झोप येणे.
187डोळे उघडणे-अनुभवाने सावध होणे.
188डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
189डोळे निवणे- समाधान होणे.
190डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
191डोळ्यात अंजन घालणे- चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
192डोळ्यात खुपणे- मत्सर करणे.
193डोळ्यात धूळ फेकणे- खोटेनाटे सांगून फसवणे.
194डोळ्याला डोळा न लागणे- झोप न येणे.
195डोळ्याचे पारणे फिटणे- समाधान होणे किंवा पाहून आनंदित होणे.
196डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.
197डोळ्यातून थेंब न काढणे- मोठा आघात होऊनही न रडणे.
198तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापने.
199तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.
200तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे / अडचणीत येणे.
201तोंडचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.
202तोंड देणे- सामना करणे
203तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे.
204तोंड भरून बोलणे- मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
205तोंड वेंगाडणे- याचना करणे.
206तोंड सांभाळून बोलणे- जपून बोलणे.
207तोंड सुख घेणे- दोष देताना वाटेल तसे बोलणे.
208तोंडाची वाफ दवडणे- वायफळ बडबड करणे.
209तोंडात बोट घालणे- आश्चर्यचकित होणे.
210तोंडात शेण घालणे- पराकोटीची निंदा करणे.
211तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.
212तोंडाला तोंड देणे- भांडणे.
213तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.
214दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.
215दात धरणे- सूड घेण्याची भावना बाळगणे.
216दात विचकणे- निर्लज्जपणे असणे.
217दाताच्या कण्या करणे- वारंवार विनंती करणे.
218दाती तृण धरणे- शरण जाणे.
219नजर चुकवणे- न दिसेल अशी हालचाल करणे. 
220नवल वाटणे- आश्चर्य वाटणे, चकित होणे.
221नाक उडवणे- थट्टा, उपास करणे
222नाक कापणे- थट्टा उपहास करणे
223नाक खुपसणे- नको त्या गोष्टीत उगाच सहभाग घेणे
224नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे.
225नाक मुरडणे- नापसंती दाखवणे, उपहास करणे
226नाकाने कांदे सोलने- जास्तीचे शहाणपण दाखवणे
227नाकी नऊ येणे- फार दमणे
228पदरात घेणे- स्वीकारणे
229पदरात घालने- चूक पटवून देणे
230पाठ थोपटने- शाबासकी देणे, कौतुक करणे
231पाठीशी घालणे- संरक्षण देणे
232पाठ दाखवणे- समोरून पळून जाणे
233पाठ पुरवणे- सारखे मागे लागणे
234पाठबळ असणे- आधार असणे
235पाठीला पोट लागणे- उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे
236पाठ न सोडणे- एखाद्या गोष्टीचा पिच्चा पुरवणे
237पाढा वाचणे- सविस्तर सांगणे
238पाणी दाखवणे- सामर्थ्य दाखवणे
239पाणी पडणे- वाया जाणे, नष्ट होणे
240पाणी मुरणे- कपटाने काहीतरी लपवून ठेवणे
241पाणी पाजणे- पराभव करणे
242पाणी सोडणे- अशा सोडणे
243पाय काढणे- विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
244पाय घसरणे- तोल जाणे, मोहात फसणे
245पायबंद घालने- आळा घालणे
246पाय मोकळे करणे- फिरायला जाणे
247स्वतःच्या पायावर उभे राहणे- स्वतंत्र किंवा स्वावलंबी होणे
248पोटात कावळे कोकळणे- खूप भूक लागणे
249पोटात ठेवणे- गुपित सांभाळून ठेवणे
250पोटात शिरणे- मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे
251पोटाला चिमटा घेणे- अत्यंत काटकसरीने राहणे
252पोटावर पाय देणे- रोजंदारी बंद करणे
253पोटाशी धरणे- माया करणे, कुशीत घेणे
254प्राणापेक्षा जपणे- स्वतःच्या जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
255बोटावर नाचवणे- हवे तसे खेळवणे
256मनात अढी धरणे- एखाद्याविषयी मनात राग निर्माण होणे
257मांडीवर घेणे- दत्तक घेणे
258मुठीत असणे- ताब्यात असणे
259रक्त आटवणे- अतीकष्ट करणे
260रक्ताचे पाणी करणे- अतिश्रम करणे
261हाडांची काडे करणे- अतिकष्ट करणे
262हाडे खिळखिळी करणे- भरपूर चोप देणे
263हात आखडणे- देण्याची क्षमता असतानाही कमी देणे
264हातघाईवर येणे- मारमारीची पाळी निर्माण करणे
265हातचा मळ असणे- एखादी गोष्ट सहज करता येणे
266हात झटकणे- नामानिराळा होणे
267हात टेकणे- नाईलाजाने शरण येणे
268हात दाखवणे- मार देणे, फसवणे
269हात देणे- मदत करणे
270हात मारणे- ताव मारणे 
271हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे
272हातापाया पडणे- लाचारीने विनवण्या करणे
273हातावर तुरी देने- डोळ्यादेखत फसवून पळणे
274दोन हात करणे- सामना करणे, टक्कर देणे
275हृदय भरून येणे- गदगदून येणे